Logo
International Journal of
Social Science and Humanities
ARCHIVES
VOL. 8, ISSUE 1 (2026)
मौलाना अबुल कलाम आझाद यांचे शैक्षणिक दृष्टीकोन आणि राष्ट्रीय शिक्षण दिनाचे समकालीन महत्त्व
Authors
डॉ. सविता ज्ञानेश्वर वावगे
Abstract
मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ आणि थोर स्वातंत्र्यसेनानी होते। मौलाना आझाद यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा, त्यांच्या संस्थात्मक योगदानाचा तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या समकालीन महत्त्वाचा अभ्यास करण्यात आला आहे। या संशोधनासाठी गुणात्मक व वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्यात आला असून पुस्तके, संशोधन लेख, शैक्षणिक धोरणे व शासकीय अहवाल यांसारख्या दुय्यम स्रोतांचा वापर करण्यात आला आहे। मौलाना आझाद यांनी शिक्षणाला राष्ट्रनिर्मिती, सामाजिक परिवर्तन आणि व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी साधन मानले। सर्वांसाठी शिक्षण, समान संधी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सांस्कृतिक एकात्मता या मूल्यांवर त्यांनी विशेष भर दिला। त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ अनुदान आयोग (न्ळब्), भारतीय तंत्रज्ञान संस्था (प्प्ज्े) तसेच साहित्य व कला अकादमींची स्थापना होऊन भारतीय उच्च शिक्षणाला भक्कम पाया मिळाला। अभ्यासातून असे स्पष्ट होते की, २१ व्या शतकातील डिजिटल शिक्षण, सामाजिक न्याय आणि जागतिक नागरिकत्वाच्या संदर्भात मौलाना आझाद यांचे शैक्षणिक विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत। राष्ट्रीय शिक्षण दिन त्यांच्या शैक्षणिक वारशाची आठवण करून देत सर्वसमावेशक, गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज अधोरेखित करतो।
Download
Pages:208-209
How to cite this article:
डॉ. सविता ज्ञानेश्वर वावगे "मौलाना अबुल कलाम आझाद यांचे शैक्षणिक दृष्टीकोन आणि राष्ट्रीय शिक्षण दिनाचे समकालीन महत्त्व". International Journal of Social Science and Humanities, Vol 8, Issue 1, 2026, Pages 208-209
Download Author Certificate

Please enter the email address corresponding to this article submission to download your certificate.